महाराष्ट्र

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सफाळे देवभूमी येथून केला प्रचाराचा शुभारंभ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640

बहुजन विकास आघाडीची भव्य बैठक देवभूमी सफाळे येथे बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. या बैठकीनंतर गणरायाच्या व संविधानाच्या प्रतीमेसमोर नारळ वाढवून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा शुभारंभ सफाळे देवभूमी येथून केला

या बैठकीला आमदार राजेश पाटील यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील, प्रविण राऊत , सुरेश तरे, तालुका अध्यक्ष, प्रमुख नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजीव नाना व प्रविण दादा यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी मार्गदर्शन केले. तसेच आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिले. व आपल्या अथक प्रयत्नानंतर शिटी निशाणी आपल्याला मिळाली हा आपला पहिला विजय असल्याचे सांगितले.

मागील वेळी जेव्हा राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो बोईसर मतदारसंघासाठी नवखा चेहरा होता. मात्र निवडून आल्यावर सतत पाच वर्षे, विशेषतः कोव्हिड सारख्या जागतिक महामारीच्या काळात सुध्दा जनतेत जाऊन त्यांनी कामे केली. त्यांना जेवण पोहचविणे, हॉस्पिटलमध्ये बेड तसेच रेमेडिसिव्हिअर, ऑक्सिजन उपलब्ध करून देत त्यांची काळजी घेतली. कोविड काळात मतदार क्षेत्रात निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र पुढील तीन वर्षांत वेगवेगळ्या योजनांतून जवळपास 1400 ते 1500 कोटींचा निधी मतदार क्षेत्रात आणला. व प्रत्येक गाव पाड्यापर्यंत विकास कामे पोहचवली.

जल जीवन मिशन, मत्स्य विभाग, कृषी विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास निधी, ठक्कर बाप्पा अशा विविध योजनेतून लाभ हा तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवला. त्यांच्या या मेहनतीला कौल देत पक्ष श्रेष्ठींनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा पुन्हा राजेश पाटील या कर्तव्य तत्पर आमदारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे व आपल्या मतदारसंघातील विकासासाठी पालघर जिल्ह्यातील आपले स्थान बळकट करायचे आहे अशी प्रतिज्ञा घेत कार्यकर्ते नवी ऊमेद व ऊत्साहासह आपआपापल्या मतदार विभागात कार्यरत झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button