सामाजिक

सफाळे पूर्व येथील पोमेलो गार्डन रिसॉर्ट मध्ये बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

बोईसर मतदार संघातील विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे, जलसार, मांडे, दातिवरे, डोंगरे, भादवे, चटाळे, नगावे अशा अनेक गावांत बोईसर मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक 03 मार्च 2024 रोजी करण्यात आले.

यावेळी गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ‘राजेश पाटील सारखा आमदार आजपर्यंत आमच्या मतदारसंघात झाला नाही आणि होणारही नाही’ असे भावनिक मत आमदारांचे अभिनंदन व कौतुक करताना गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच नवघर ते घाटीम या कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजन देखील बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर सफाळे पूर्व येथे पोमेलो गार्डन रिसॉर्ट मध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

या मेळाव्याला बोईसर, पालघर तसेच डहाणू तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते व पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती . यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्ष हा जिल्ह्यात एक नंबरवर पक्ष असून आता पालघर डहाणू मतदारसंघात देखिल बहुजन विकास आघाडीचाच आमदार असावा व खासदार देखिल आपल्याच पक्षाचा असावा असा आग्रह धरला होता . यासाठी सर्व कार्यकर्ते तयार असून फक्त आपल्या आदेशाची वाट पाहत आहोत अशी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे आग्रही मागणी केली.तसेच आपल्या कार्यकाळात बोईसर मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची कामे पोहचवली असून एक ही गाव विकास कामापासून वंचित राहिलेला नाही असे सांगताना आमदार राजेश पाटील यांनी प्रत्येक गावाशी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधताना माझ्याकडून पुर्ण प्रामाणिक प्रयत्न झाला व जनतेकडूनही मला चांगला प्रतिसाद प्रेम मिळाल्याने मी हे करू शकलो हे काम अजूनही अपुर्ण असून यापुढेही जनतेच्या सर्व आशा आकांशाना न्याय देण्यासाठी मी लोकनेते आप्पा व पक्षाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील राहीन असे मत व्यक्त केले. यावेळी या मेळाव्यात माजी राज्यमंत्री व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनिषा निमकर यांनी पक्षाने संधी दिल्यास पालघर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली. तसेच आपल्या कार्यकाळात तळागाळातील लोकांसाठी काम केले असून यापुढेही नेटाने करत राहीन अशी ग्वाही दिली.यावेळी या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्या व बहुजन विकास आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भावना विचारे, माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर मेळाव्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील,तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,तालुका अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नागेश पाटील,माजी बांधकाम सभापती सुरेश तरे,युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र राजपूत,बहुजन विकास आघाडी आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष प्रसाद पर्हाड ,तालुका युवा अध्यक्ष कमनिष राऊत ,युवती अध्यक्षा धनश्री रेवंडकर,प्रज्ञा ताई तरे, हे पदाधिकारी व सरपंच ,उपसरपंच शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button