शहर

पालघर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती प्रक्रियेच्या स्थगितीमुळे पात्र उमेदवार ताई गभाले या तरुणीचा अकस्मात मृत्यू.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे एका उमेदवार तरुणीचा नैराश्यामुळे मृत्यू झाल्याची घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात घडली आहे.

पालघर जिल्ह्यात पेसा शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरलेल्या ताई गणपत गभाले राहणार तालुका जव्हार या तरुणीला भरती प्रक्रिया थांबल्यानतर नैराश्याने घेरले होते. यापूर्वी २०१४ साली झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत ताई गभाले ही योग्यता पात्र झाली होती. मात्र या भरतीवर न्यायालयीन स्थगीती आल्यामुळे ती नैराश्याच्या गर्तेत गेली होती. त्यातच पुन्हा पेसा शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र ठरून देखील नोकरी पासून मुकल्यामुळे नैराश्याने तिचा मृत्यू झाल्याचे आरोप होत आहेत. शासनाच्या या कार्यप्रणाली विरुद्ध संपूर्ण पालघर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

पालघर जिल्हा पेसा क्षेत्रा साठी एकूण १३१८ पदांसाठी शिक्षक भरती होती. भरती प्रक्रिया ही पूर्ण होऊन त्यातील ८३५ शिक्षक कागदपत्रे पडताळणी करून जिल्हा परिषदेने पात्र ठरवले आहेत. शिक्षकांचे समुपदेशन होऊन शाळा निश्चिती केल्या होत्या फक्त त्यांना नियुक्ती देणे बाकी असताना जिल्ह्यातील बिगर आदिवासी संघटनानी या भरती प्रक्रियेसाठी न्यायालयात धाव घेऊन या शिक्षक भरती वर स्थगिती आणली आहे.यामुळे या उमेदवारांवर सध्या बेरोजगारीचे आणि नैराश्याचे सावट पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button