पालघर कोर्टातील सरकारी वकील सुनील सावंत यांना 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी केले रंगेहात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेवर पोलीस नाईक पदावर काम करत असलेले पोलीस नाईक यांच्याकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 7000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पालघर कोर्टातील सरकारी वकील सुनील सावंत यांना गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस नाईक (तक्रारदार ) हे 2015 मध्ये पालघर जिल्ह्यातील तारापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्या बाबतची केस पालघर कोर्टात चालू होती. या केसचा निकाल जून 2023 रोजी पोलीस नाईक (तक्रारदार) यांच्या बाजूने लागला असून त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. करण्यात आली आहे.
म्हणून पोलीस नाईक यांनी पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेकडे त्यांच्या पदोन्नती बाबत अर्ज केला होता. याबाबत सत्यता पडताळून पाहण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलीस नाईक हे निर्दोष मुक्त आहेत असा अहवाल मागवण्यात आला होता.
हा अहवाल देण्यासाठी पालघर कोर्टातील सरकारी वकील सुनील बाबुराव सावंत वय वर्ष 51 यांनी पोलीस नाईक यांच्याकडे 10,000 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी 7000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सुनील सावंत या सरकारी वकीलाला पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, संजय सुतार, नवनाथ भगत, नितीन पाकधरे, योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी, पोलीस शिपाई चालक जितेंद्र गवळी या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्यावर 26 ऑक्टोबर 2023 रोजी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



