मराठा- कुणबी समाजातील युवक – युवतींना सीएसएमएस – डीईईपी ‘त अभ्यासक्रम मोफत शिकवला जाणार

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी
बावडा येथील ॲम्बिशन व्हेंजर
कॉम्प्युटर एज्युकेशन’ मध्ये मराठा- कुणबी समाजातील युवक-युवतींना सीएसएमएस – डीईईपी ‘त अभ्यासक्रम मोफत शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी सारथी व एमकेसीएल यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवीला जात आहे. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रीया १६ जानेवारी पासून सुरू झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲम्बिशन व्हेंजर कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहीजे. तसेच संबधीत विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे तसेच प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहीवासी दाखला आवश्यक आहे. छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ ( एमकेसीएल ) यांच्याव्दारे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.
मराठा, कुणबी, कुणबी- मराठा आणी मराठा कुणबी समाजातील युवक युवतीसाठी हा अभ्यासक्रम मोफत आहे. सहा महीन्याचा हा अभ्यासक्रम असून १० हजार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण एमकेसीएल च्या अधिकृत केंद्रामार्फत दिले जाईल. ऑनलाईन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. सदरची नोंदणी १६ जानेवारीपासून सुरु झाली आहे. बावडा येथील ॲम्बिशन व्हेंजर कॉम्प्युटर एज्युकेशन ग्रामसचिवालय बिल्डिंग ग्रामपंचायत गाळा नं. ९ व १० येथे भेट द्यावी.



