शहर

पालघर मनोर मासवण गावातील मयूर पिंपळे यांच्या घरी चोरी करून चोर फरार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
विजय घरत.पालघर जिल्हा वृत्तांत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.

पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मासवण गावातील मयूर पिंपळे यांच्या बंद बंगल्याचा दरवाजा तोडून या बंगल्यातील बंद कपाटातील सोने-चांदीसह घरगुती वापराच्या वस्तू चोरी करून चोर फरार झाला आहे.

मयूर बळवंत पिंपळे वय वर्ष 35 हे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन शाखा अभियंता पालघर येथे कार्यरत असून सध्या त्यांचे वास्तव्य पालघर येथे आहे.
पालघर जिल्ह्यातील मनोर येथील मासवण गावात त्यांचे घर आहे या घरात त्यांची आई श्रीमती भावना पिंपळे या एकट्या राहत असून त्यांची तब्येत आजारी असल्यामुळे त्या 31 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा लहान मुलगा मनीष पिंपळे यांच्याकडे पालघर नवली येथे राहण्यासाठी गेल्या होत्या त्यांची तब्येत बरी झाल्यावर त्यांचा मोठा मुलगा मयूर पिंपळे आपल्या आईला सोडण्यासाठी गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी मनोर मासवण येथे असलेल्या आपल्या घरी गेले असताना त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे लॉक तुटलेले व घर उघड्या स्वरूपात होते तसेच घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातील सोन्याची नागाची मूर्ती,चांदी व रोख रक्कम चिल्लर तसेच इन्वर्टर,सिलेंडर बॅटरी,व शेगडी असा एकूण 58 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने लंपास करून तो फरार झाला आहे.

घटनास्थळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांनी भेट दिली असून मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस फरार आरोपी चोराचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button