काळम्मादेवी यात्रा विशेष काळमवाडी

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो 8007932121 रिपोर्टर टाइम्स 9 मराठी न्यूज
सांगली : वाळवा तालुक्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाल असणाऱ्या केदारगाव पासून पच्शिमेस 2 किमी अंतरावर काळमवाडी हे गाव असून या ठिकाणी काळम्मादेवी हे जागृत देवस्थान आहे, या देवीची यात्रा दूर्गाष्टमीस भरते म्हणजे रविवार 22.10.2023 रोजी झाली. देवी नवसाला पावते अशी भक्तांची धारणा आहे. यात्रेस जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त आणि वर्ष भरांध्ये चार लाखाहून अधिक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात,

घटस्थापनेपासून देवीच्या उत्सवाला सुरुवात होते, आनंदराव यशवंत सावंत यांच्या घरी देवीचे वास्तव्य असते घतशपनेच्या दिवशी या देवीची प्रतिष्ठापना मंदिंरत केली जाते. या दिवसापासून दसाऱ्यापर्यंत देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. दररोज पहाटे 4 वाजता, दुपारी 12 आणि रात्री 12 वाजता देवीची आरती होते, नवरात्री मध्ये गावातील भक्त जन नऊ दिवस नवरात्री उपवास धरतात या उपवासाच्या वेळी फळे, दूध आणि खजूर खातात.

सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, भजन कीर्तन आणि प्रवचन असे सात दिवस सप्ताह नियोजन असते आठव्या दिवशी म्हणजे अष्टमी दिवशी देवीचा जागर म्हणजे गावची यात्रा असते, पहाटे 5 वाजल्या पासून भक्तांची दर्शनासाठी ये जा सुरू असते दुपारी 12 वाजताची आरती झाल्यानंतर 1 वाजता इंगळ पेटवून 50 ते 1 लाखा पर्यंत भाविक भक्त या रख रखत्या इंगलावरून चालत असतात 1 ते 4 हा कार्यक्रम सुरू असतो, 4 नंतर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नर्ले भाग शाळा काळमवाडी शाळेच्या मैदानावर भव्य कुस्ती आयोजित केली होती कुस्ती मैदानावर भारतातील नावाजलेले मल्ल आले होते. लहान मोठ्या एकूण 100 पेक्ष्या जास्त कुस्ती पार पडल्या.

काळमवाडी यात्रेस भागातील राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते,
महाराष्ट्रराज्याचे माजी कृषी मंञी मा.सदाभाऊ खोत यांच्या पत्नी सौ.सुमन सदाभाऊ खोत (काकी)यांनी दर्शन घेतले यावेळी सोबत माया खोत (काकी) योगेश शिंगाड़े उपस्थित होते




