माळशिरस तालुक्यात अद्याप कोविडचा एकही रुग्ण नाही–घाबरण्याची आवश्यकता नाही– तालुका आरोग्य अधिकारी,डाॕ. रामचंद्र मोहिते .

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
माळशिरस तालुक्यात अद्याप कोविडचा एक ही रुग्ण आढळला नाही.घाबरून जाण्याची आवश्यकता नाही परंतु शक्य तेवढे सतर्क रहावे अशी माहिती माळशिरस पंचायत समिती आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते यांनी दिली
असून,महाराष्ट्रामध्ये व जिल्ह्यामध्ये काही भागात कोविड संक्रमण होत असून रोजच्या रोज वाढत असल्याच्या बातम्या आपण ऐकत आहात. कोविडची परिस्थिती निर्माण होऊन तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत. सर्वजण अशा प्रकारच्या बातम्याला कंटाळले आहेत. त्यातच नवीन पोस्ट टाकून घाबरवण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. परंतु सद्यस्थिती आपणास माहित असावी आणि आपण थोडे सजग राहावे हा हेतू आहे.
आत्ताची परिस्थिती प्रथम दर्शनी पहिल्या लाटेसारखी वाटत आहे.सुरुवातीला पुणे,मुंबई व मोठ्या शहरात काही रुग्ण निघत होते.आपल्याकडे एकही रुग्ण नव्हता.आपण आपल्याकडे पेशंट निघणार नाहीत अशा समजत होतो.परंतु काही दिवसातच आठ-दहा असणारे रुग्ण शंभराच्या पटीत झाले.अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपण काळजीपूर्वक राहिले पाहिजे.आपणाकडे सध्या तालुक्यात रुग्ण नाही.सध्या घाबरून जाण्याची परिस्थिती नसली तरीही आपण काळजीपूर्वक राहिले पाहिजे.
गर्दीच्या ठिकाणी जाताना योग्य प्रकारे मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा.सोशल डिस्टंसिंग तसेच सॅनिटायझरचा वापर गरजेनुसार करावा. आपणास सर्दी ,खोकला ,ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित आपण जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घ्यावा.पहिल्या आणि दुसर्या लाटेचा आणि आता निघणाऱ्या रुग्णांमध्ये एक फरक प्रकर्षाने जाणवत आहे की रुग्ण निघत असले तरीही ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण कमी आहे.
याचाच अर्थ काढता येतो की लसीकरणामुळे ऑक्सिजनवर रुग्ण जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. लस उपलब्ध होताच आपणास कळविले जाईल तेव्हा राहिलेले लसीकरण आपण पूर्ण करून द्यावे.
कृपया सर्वांनी खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती.
डॉ.रामचंद्र मोहिते,
तालुका आरोग्य अधिकारी,
पंचायत समिती माळशिरस



