बागल गटाला दणका.श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावर आरसीसी प्रमाणे कारवाई करण्याचे प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांचे आदेश.दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांची पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
तालुक्यातील श्री मकाई सह. साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२१ ची ऊस पुरवठादारांना देय बाकी असलेली रक्कम वारंवार सूचना देऊनही चुकती न केल्याने आयुक्त साखर महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर.आर.सी. प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित केले होते. आता या कार्यवाहीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

याबाबत सविस्तर बोलताना प्रा. झोळ यांनी सांगितले आहे की, या कार्यवाहीनुसार मकाई कारखान्याकडे २०२२-२३ च्या हंगामातील एफआरपी दराप्रमाणे २६ कोटी ३२ लाख १८ हजार आणि त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी आरआरसी आदेश साखर आयुक्त, पुणे यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु मकाईच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्य आरआरसी आदेशातील रकमेपेक्षा कमी असल्याने जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे तत्कालीन संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्तेवर बोजे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग -१ यांनी दिलेल्या मकाईच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या यादीनुसार कारखान्याकडे केवळ २ लाख ७५ हजार रुपयांची साखर शिल्लक आहे.

अशाप्रकारे कारखान्याच्या मालमत्तेपेक्षा देय रक्कम जास्त असल्यामुळे प्रादेशिक सहसंचालक (सोलापुर) पांडुरंग साठे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या पत्रात मकाई कारखान्याच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपी रकमेचबाबत आरआरसी प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळवले आहे. या पत्राची प्रत तहसीलदार करमाळा यांनाही पाठवण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. झोळ यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली आहे



