महाराष्ट्र

पालघर भाजप जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांच्या हस्ते वाणगांव येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क. पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

भारतीय जनता पार्टी भाजपचे नवनिर्वाचित पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी डहाणू तालुक्यातील वाणगांव येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

वाणगांव येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास भाजप जिल्हा उपाअध्यक्ष जगदीश भाई राजपूत, पालघर विधानसभा प्रमुख संतोष जनाठे, जिल्हा उपाध्यक्ष पंकज कोरे, उत्तर भारतीय मोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष आर.बी. सिंह, बोईसर मंडळ अध्यक्ष महेंद्र भोणे, ज्येष्ठ नेते मनोहर जैन, अशोक दवणे तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात वाणगांव येथील भरत बारी यांनी आपल्या वाणगांव पाटेपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांसह पालघर भाजप जिल्हा अध्यक्ष भरत भाई राजपूत यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी भाजप पक्षात प्रवेश घेतला.
वाणगांव येथील भरत बारी हे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button