केळवा रोड येथील आतेश भोईरचा अपघात की घातपात…. कुटुंबीयांची रेल्वे पोलिसांकडे अधिक चौकशीची मागणी..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
मित्राच्या लग्नाला गेला तो परतलाच नाही दुसऱ्या दिवशी घरी आला तो त्याचा मुतदेह ही घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील केळवा रोड वाकसई गावात शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी आतेश प्रकाश भोईर वय वर्ष (28) राहणार केळवा रोड वाकसई हा तरुण त्याच्या मित्राच्या लग्नाला शनिवारी रात्री मायखोप पाटील पाडा गावात गेला होता.
तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असतात त्याची दुचाकी आणि त्याचा मृतदेह केळवा रोड स्टेशन रुळावर रविवारी सकाळी रेल्वे पोलिसांना सापडला आहे.

या बाबत पालघर रेल्वे पोलिसांनी अपघाती रेल्वे मृत्यूची नोंद केली असून याबाबत आतेश भोईर यांच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे.कारण तो लग्नासाठी जाताना त्याच्या मित्राकडे त्याची मोटर सायकल घेऊन गेला असताना तो रेल्वे रुळा जवळ का जाईल तसेच त्याचे लग्न 10 मेला आणि साखरपुडा 19 एप्रिलला होते मग तो आत्महत्या का करेल यामुळे या मृत्यूबाबत अधिक चौकशीची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी पालघर रेल्वे पोलिसाकडे केली आहे.



