शहर
सफाळे येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या..

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर तालुक्यातील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालकरीपाडा येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 24 जून 2023 रोजी शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.या घटनेप्रकरणी सफाळे पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवनीत नागेश पवार वय वर्ष (27) राहणार मालकरीपाडा, सफाळे (पूर्व) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाने अचानक आत्महत्या का केली यासंदर्भात अद्यापपर्यंत ठोस माहिती मिळाली नसून तो विवाहित होता व काही दिवसापासून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्यामुळे मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी याबाबत सफाळे पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहेत.



