शहर

‘माणुसकीची दिवाळी’ राष्ट्रीय, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाकडून गोरगरिबांना वस्त्रदान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज: राष्ट्रीय, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने दिवाळीच्या पाडव्या सणाच्या (दिनांक २२/१०/२०२५) निमित्ताने अकलूज शहरातील गोरगरीब आणि भटकंती करणाऱ्या गरजू लोकांना नवीन कपड्यांचे वाटप करून ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी करण्यात आली.

​सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, समाजातील गोरगरीबांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात नेहमी आवाज उठवतो. यासोबतच, शासन व शासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या मानवी हक्कांचे आणि मानवाधिकारांचे उल्लंघनावरही ही संस्था सातत्याने काम करत आहे. या संस्थेने अनेक गोरगरीब, पीडित आणि अन्याय-अत्याचार झालेल्या लोकांना शासन दरबारात कायदेशीर पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला आहे.

नेतृत्व व उपस्थिती:

हा उपक्रम संस्थेचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस भाई परमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

​यावेळी पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखालील टीम उपस्थित होती.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:

  • अमोल बाळासाहेब माने (पश्चिम भारत अध्यक्ष)
  • रोहित टेके (संग्राम नगर शहर विभाग अध्यक्ष)
  • मोहन पालखे (जेष्ठ नागरिक)
  • शुभांगीताई मोरे (सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा)
  • अश्विनीताई पांढरे (सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा)
  • वंदनाताई तिकोटे (माळशिरस तालुका महिला अध्यक्षा)

​संघाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजूंना दिवाळीचा आनंद मिळाला, तसेच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button