शहर

पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील 18 वर्षीय तरुणीची हत्या करून आरोपीने घेतला गळफास

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका येथील आश्रमशळेतील 12 वी सायन्स मध्ये शिकणाऱ्या अर्चना लक्ष्मण उदार वय वर्ष 18 या विद्यार्थिनीची धारदार शस्त्राने हत्या केल्या नंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2023 रोजी मोखाडा तालुक्यात घडली आहे.

महाविद्यालयातून आश्रम शाळेतून परत येत असताना तिला रस्त्यात अडवून आरोपी प्रभाकर वाघेरा वय वर्ष 22 याने अर्चनाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यानंतर आरोपी प्रभाकर वाघेरा फरार झाला होता.
शनिवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2023 रोजी पहाटे मोखाडा मधील तुळ्याचा पाडा जवळ त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. घटनास्थळी मोखाडा पोलीस निरीक्षक संजय जगदाळे यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मोखाडा पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button