महाराष्ट्र

छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे शाळेत रंगला रानभाज्या मेळावा

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजमाता जिजाऊ विकास प्रबोध संस्था, जव्हार संचलित, छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे ता. जव्हार, जि.पालघर येथे सोमवार दि.२९/०७/२०२४ रोजी शाळेतील मुख्याध्यापक, श्री.पी.एम. रुकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्गाकडून रानभाज्या मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी विद्यार्थ्यांनी तब्बल ४४ रानभाज्या मेळाव्यात ठेवल्या होत्या. पावसाळा सुरू झाला की आजूबाजूला छोट्या गावांमध्ये डोंगरदरी कपाऱ्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या उगवू लागतात या रानभाज्या खूप औषधी असतात. या पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या एकदा उगवत असल्याने वर्षातून एकदा तरी खाव्यात खरंतर पालेभाज्या म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात परंतु या रानभाज्याचे महत्त्व आहे. आपण परिसरात फिरत असताना या बऱ्याचश्या भाज्या आपल्याला दिसत असतात.

पण आपल्याला याची नावे माहीत नसते . त्या भाज्याचा औषधी उपयोग होतो, हेही माहीत नसते. बऱ्याच वेळा या भाज्या आपण बघतो पण ही भाजी कोणती आहे? हे मुळात कोणाला माहित नसते.परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाहण्यात व खाण्यात आलेली भाजी विद्यार्थी त्यांची नावे ओळखतात की ही भाजी कडू आहे की चवदार आहे अशा विविध भाज्यांची नावे मुले नियमित सांगत असतात त्यांच्या डब्यात सुद्धा या भाज्या असतात. ह्या भाज्यांची ओळख काही विध्यार्थीना नसल्याने ते इतर सर्व विध्यार्थीना व्हावी, त्या भाज्यांचे महत्त्व कळावे.

याविषयी माहिती व्हावी, यासाठी जव्हार तालुक्यातील छत्रपती शाहू विद्यानिकेतन,आयरे या शाळेमध्ये रानभाज्या मेळावा घेण्याचा उद्देश शाळेच्या मुख्याध्यापक श्री. रुकारी सरांनी सांगितलं. प्रथम परिसरामध्ये होणारे विविध भाज्यांची माहिती विद्यार्थ्याकडून करून घेऊन त्यांची एक यादी बनवण्यात आली सोबतच पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही हिरव्या भाज्यांची नावे विध्यार्थीनी सांगितले.

या मेळावा मध्ये शाळेतील विध्यार्थीनी आंबटचुका, गुळवेल, घोळकाजी भुई आवळा आघाडा, मटाळू, कारटोल, वास्ता (बाबू), कपाळफोडी, खापर खुटी, गोखरू, चाकवत शेवगा, उडिद पाला ,खुरासणी पाला, माट भाजी,तरोडा, तादळीची भाजी, पेंडर , कुरडू करटोले ,खापरा शेवगाचा पाला इ. रानभाज्या यात सहभागी करून घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने या भाज्यांची नावे व माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी आयरे ग्रामपंचायतिचे सरपंच मा. श्री जयेंद्रा धिंडा साहेब,मा.उपसरपंच साहेब, व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते. या मेळाव्याचा पालक, विध्यार्थी यांनी मन मुराद आनंद घेतला तसेच मुलांना एक वेगळाच आनंद अनुभवास मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button