शहर
ॲड. प्रमोद जाधव यांना मातृशोक

करमाळा प्रतिनिधी-आलिम शेख
तालुक्यातील कोर्टी येथील सौ. प्रमिलाबाई बलभीम जाधव (वय-७४) यांचे आज शनिवार दि. २६/१०/२४ रोजी सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. उद्या रविवार दि. २७ रोजी सकाळी ८ वा. कोर्टी एसटी स्टँड जवळील त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून कोर्टी गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम जाधव यांच्या त्या अर्धांगिनी तर करमाळा न्यायालयातील वकील ॲड. प्रमोद जाधव यांच्या त्या मातोश्री होत.



