शिवसेना ठाकरे गटाच्या “होऊ दे चर्चा “अभियानचा हिवरे येथुन शुभारंभ,अभियानाला मिळत आहे मोठा प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
केंद्र सरकार व मिंधे सरकार च्या बोलघेवड्या सरकारचा भांडाफोड करून सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्यासाठी शिवसेना माढा लोकसभा निरिक्षक राहूल चव्हाण पाटील यांच्या मार्गदर्शनातुन संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात होवू दे चर्चा अभियान सुरू असून या अनुषंगानेच आज शिवसेना युवासेनच्या वतीने हिवरे येथे “होवू दे चर्चा” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे शहरप्रमुख प्रवीण कटारिया युवा सेना तालुकाप्रमुख शंभू फरतडे यांनी मोदी सरकारकडून नऊ वर्षांत केलेल्या बोलघेवड्या योजनांचा समाचार घेण्यात आला.

स्विस बँकेतील काळे धन आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख, आरबी समुद्रात जगातील सर्वात मोठे शिवस्मारक, कोट्यावधी युवकांना रोजगार, महागाई कमी करण्याचे आश्वासन, महाराष्ट्रातील मोठे उद्योग कंपन्या गुजरात राज्यात घेऊन जाणे, कंत्राटी कामगार पद्धती, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान या मुद्द्यावर लोकांना बोलते केले.
या अभियानास जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून
गॅस दरवाढ, इंधनवाड, खतांच्या बेसुमार किमती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत होणारी हेळसांड, या विषयावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.

यावेळी तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड,तालुका संघटक संजय शिंदे ,महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण ,उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर,उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, भालेराव, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव ,तालुका चिटणीस उपसरपंच पांडुरंग ढाणे,शहरप्रमुख समीर परदेशी , उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, युवासेनेचे दिनेश पाटील, परशूराम माने, गणेश माने, विनोद पाटील बाळराजे फरतडे मोतीराम फरतडे, दत्ता पुजारी आनिल शिंदे आदी उपस्थित होते.



