महाराष्ट्र

आगामी निवडणुकीत राजाभाऊ कदम यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी पाटील गट देणार,सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

राजाभाऊ कदम यांना पाटील गट आगामी निवडणुकीत सत्तेत सहभागी होण्याची संधी देणार असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक राजाभाऊ कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु ही निवडणूक बिनविरोध झाल्याने कदम यांना उमेदवारी अर्ज माघारी घेणं भाग पडले. याचे पडसाद जनमानसात उमटू लागल्या मुळे पाटील गटाकडून आज याबाबत मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक राजाभाऊ कदम यांनी मोलाची साथ दिली आहे. सन 2014 मधील विधानसभा निवडणुकीत कदम यांचे योगदान महत्वपूर्ण व निर्णायक ठरले याची जाणीव पाटील गटास आहे. राजाभाऊ कदम हे आंदोलन करून विविध प्रश्नांची सोडवणूक करत असतात. दलीत समाज, शेतकरी, ऊस उत्पादक यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजाभाऊ कदम यांनी केलेली आंदोलने दखल पात्र आहेत.

बहुजन संघर्ष सेनेची व पाटील गटाची युती आगामी काळात सुध्दा कायम घट्ट राहणार आहे  माजी आमदार नारायण पाटील व राजाभाऊ कदम यांच्यात चर्चा झाल्यानंतर राजाभाऊ कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला यामुळे आगामी निवडणुकीत बहुजन संघर्ष सेनेस सत्तेचा वाटा सन्मान व आदर राखून मिळवून देण्यासाठी पाटील गट सकारात्मक भूमिका घेणार असल्याचेही तळेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button