महाराष्ट्र

मोहोळ चे माजी आमदार रमेश कदम यांच्या दमदार एंट्री ने मोहोळ विधानसभे सह सोलापूर लोकसभेत खळबळ…?

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जवळ जवळ आठ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेले आणि जुलै महिन्यात कायमचा जामीन मिळवत बाहेर आलेले मोहोळ चे राष्ट्रवादी चे माजी आमदार रमेश कदम यांचे रविवार दुपार नंतर मोहोळ च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अथांग पसरलेल्या जनसागरात आगमन झाले,आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागताला न भूतो न भविष्यती गर्दी करत त्यांच्यावर फुलांची अक्षरशः बरसात करण्यात आली,या वेळी रमेश कदम भावूक झालेले पहायला मिळाले…

आपल्या स्वागत सभेत सत्काराला उत्तर देताना रमेश कदम म्हणाले की,अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 17 गावांचा रस्त्यांचा प्रश्न यावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ते ही संकल्पना माजी आमदार कदमांनी मोहोळ मतदारसंघात आणखी एकदा यशस्वी राबवून दाखवू असेही ते म्हणाले…

त्यांच्या स्वागता साठी जमलेल्या गर्दीमुळे एक गोष्ट मात्र नक्की की जनतेच्या मनातील या आमदारामुळे मोहोळ विधानसभे सह सोलापूर लोकसभेत अक्षरशः खळबळ माजली असून अनेक राजकीय तज्ञांचे त्यांनी गणिते बिघडवत मोहोळ मध्ये खळबळ उडवून टाकली आहे.

फक्त रमेश कदम या नावावर जमलेली गर्दी आणि भविष्यातील त्यांची राजकीय भूमिका बघणं खरंच औत्सुक्याच ठरणारं आहे,त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस टाईम्स 9 मराठी न्युज चँनेलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button