महाराष्ट्र

महाळुंग श्रीपुर हद्दीतील अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीने दि १०/०८/२०२३ रोजी समस्त नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सभागृहात गावातील व्यसनाधीनता संपवण्यासाठी संपूर्ण गाव दारू बंद करण्यासाठी ठराव करून घेतला व त्यानुसार दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी दुय्यम राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अकलूज व अकलूज पोलीस स्टेशन यांच्याकडे रीतसर पत्र देऊन दारू बंदीची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नगराध्यक्ष लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना पत्र व्यवहार करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

महाळुंग श्रीपुर नगरपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुण व्यसनाधीन, झाल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे.दारू, ताडी, गुटखा, खरा, मटका, ऑनलाइन मटका, जुगार, आदी व्यसने बंद व्हावीत यासाठी नगरपंचायत च्या सभागृहामध्ये एकमताने ठराव करून प्रशासनाला पत्र देण्यात आले परंतु आज तागायत कारवाई झाली नाही

पोलिस अधीक्षक यांनकडून जिल्ह्याच्या वतीने माळशिरस तालुक्यासाठी एक स्पेशल फोर्स टीम पाठवण्यात यावी व कारवाई करण्यात यावी तसेच ज्यांच्यावर गुटखा, व दारूचे आरोप आहेत अशा सराईत विक्रेत्यांना तात्काळ तडीपार करावे अशी मागणी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर महाळुंग श्रीपुर नगरपंचायत चे नगराध्यक्ष लक्ष्मी अशोक चव्हाण व गावातील त्रस्त महिला,सर्व नगरसेवक, यांच्यावतीने बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button