महाराष्ट्र

काय सांगता…? चांदापुरी येथे ”झट मंगनी पट शादीचा झटका”

चांदापुरी प्रतिनीधी रशिद शेख

आजकाल लग्न – लग्ने ही अतिशय गुंतागुंतीची समस्या झाली आहे मुलगा- मुलगी पाहणे प्रत्यक्षात लग्न पार पडणे यामध्ये कितीतरी टप्पे असतात. यात येणारी विघ्ने ही वधु – वर कक्षांची गमवणुक करणारी असतात पण कधी – कधी अचानक ”झट मंगनी, पट शादी”चा सुखद अनुभव येतो आणि समाजमन हरखुन जाते चांदापुरी येथील श्री . अजिनाथ मसु कवळे यांची सुकन्या चि. सौ . का प्रतिभा (बी . ए ) हिला बघण्यासाठी मंगळवार दि 26 सप्टेंबर 2023 रोजी रा जाकापुर जि सांगलीचे पाहुणे आले मुलगा उच्चशिक्षीत होता आणि कवळे घराणेही प्रागतिक विचाराचे होते

दुपारी मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातील उपस्थित मान्यवरांनी लग्न आजच करायचे असा निर्णय घेतला वधु- वर कक्षांनी यास त्वरीत मान्यता दिली श्री अजिनाथ मसु कवळे रा चांदापुरी ता माळशिरस जि सोलापुर यांची कन्या वधु चि सौ का प्रतिभा ( बी ए ) व श्री संजर रंगाराव साठे रा जाकापुर ता कवठे महांकाळ जि सांगली यांचे जेष्ठ चिरंजीव निलेश ( मेकॅनिकल इंजिनीयर ) यांचा शुभविवाह मंगळ दि 26 सप्टें2023 रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला

आणि वह्राड सायंकाळी वधुला घेवुन सांगलीला रवाना झाले या विवाहाप्रसंगी चांदापुरीचे लोकनियुक्त सरपंच जयवंत आण्णा सुळ , उपसरपंच तात्यासाहेब चोरमले , पार्टीप्रमुख विजयदादा पाटील , युवानेते शाहिद शेख , रमेश सुळ , हणमंत लोखंडे , हणमंत मिसाळ , मुनीर शेख , पठाणवस्तीचे ग्रा पं सदस्य अशोक सोनवणे ,माजी सरपंच महिबुब पठाण चांदापुरी सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण इ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button