महाराष्ट्र

रोहित दादा पवार व नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवक श.प.पक्षातर्फे बिटरगांव (वांगी) येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार व करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी बिटरगांव (वांगी) येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्हा युवा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजिन केले होते,

या शिबिराचे उद्घाटन जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै पृथ्वीराज (भैया)पाटील , गुरुवर्य रामभाऊ (बप्पा) निंबाळकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात रक्त लघवी, नेत्ररोग, महिलांचे संपूर्ण आरोग्य तपासणी व मोफत औषधे व चष्मा वाटप करण्यात आले, हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन मोफत जनावरांना लसीकरण केले,

यावेळी शिबीराच्या ठिकाणी हिराजी खरात, तात्या मामा सरडे, ह.भ.प अनिरुद्ध निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युवक जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे, नागेश बोरकर, सतिश (नाना) राखुंडे, गौरव राखुंडे, किरण बोरकर ,महादेव केवारे, महेश नलवडे, लक्ष्मण मंगवडे,आप्पासाहेब जानभारे, नाना सरडे, संतोष शिळके, रघुराज सरडे, मोनु निंबाळकर, गोविंद सरडे, नारायण बसळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते त्याच बरोबर वांगी 1, वांगी 4, वांगी 3, भिवरवाढी, ढोकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button