महाळुंग श्रीपुर नगरपंचायत चा अनागोंदी कारभार ? महाळुंग श्रीपुर नगरपंचायत चे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यावर माळशिरस येथील न्यायालयात दावा दाखल.

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मौजे महाळुंग- श्रीपुर नगरपंचायत यांनी दिनांक १७ /०७/२०२३ रोजी नगरपंचायत हद्दीतील वेग वेगळ्या प्रकारच्या कामाच्या निविदा नोटीस वर्तमान पत्रा मध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केल्या होत्या त्या निविदा पात्र ठेकेदारांनी दिनांक २८/०७ /२०२३ पर्यंत मुदतीत भरून दिल्या ,वरील निविदा २८/०७/२०२३ रोजी उघडण्याचा दिनांक होता ,
परंतु मर्जीतील ठेकेदार यांनाच करावयाची असल्याने सदरची निविदा तब्बल दोन महिन्यांनी उशिरा उघडण्यात आल्या त्यामधील ऑनलाइन पाकीट नंबर १ अगोदर उघडून त्यामध्ये पात्र अपात्र ठेकेदारांची कागदपत्र तपासणी असतात ज्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नसेल त्यांना शासन परिपत्रकाप्रमाणे २ दिवसाची मुदत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दिली जाते ,व पात्र अपात्र ठेकेदारांची ऑनलाइन यादी प्रसिद्ध करत पाकीट नंबर २ स्पर्धात्मक दर पत्रक उघडायचे असते परंतु असे न करता दाखल केलेल्या कमी कागदपत्राच्या निविदा न स्वीकारता ज्यादा व अंदाजपत्रकाच्या दराच्या निविदा मंजूर करून ठेकेदार व उप ठेकेदार यांना सर्व कामांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत.

अशा स्वरूपाच्या निविदाबाबत तरतुदी असताना महाळुंग श्रीपुर नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांनी कोणत्याही कायद्याचे पालन केलेले दिसत नाही ते राजकीय पुढार्यांच्या ऐकणाऱ्यातील आहेत की काय असा प्रश्न ज्या ठेकेदारांच्या निविदा ना मंजूर करण्यात आला अशा ठेकेदारांना पडला आहे. त्यामुळे मुख्यअधिकारी यांच्यावरती त्यांनाच निविदा द्यायच्या आहेत व कॉन्ट्रॅक्टर यांना काम द्यायचे नाही असा अट्टाहास महाळुंग श्रीपुर नगरपंचायतच्या राजकीय लोकांचा होता त्यास मुख्याधिकारी हे बळी पडलेले दिसत आहेत तेव्हा या सर्व घटना मुख्याधिकारी व लेखापाल यांच्या कडून बेकायदेशीर कृत्य घडले आहे
या विरोधात अपात्र केलेल्या ठेकेदारांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन न्याया व हक्कासाठी दावा दाखल केला आहे . त्यामध्ये सदरची कृत्य बेकायदेशीर ठरवून निविदा नोटीसला स्थगिती मिळावी असा दावा अपात्र ठेकेदारांपैकी १) अभिनंदन पोपट देशमाने माळशिरस, २) रणजित किसन मुंडफणे महाळुंग ,३) रोहित नंदकुमार काळे श्रीपुर, यांनी दिनांक १८ /०९/२०२३ रोजी दाखल केला आहे.

एकंदरीत पाहता महाळूंग नगरपंचायतने कमी दराच्या निविदा न स्वीकारता जादा दराच्या निविदा स्वीकारल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे हे देखील तितकेच खरे.



