महाराष्ट्र

श्रीपूर मधील टपरीधारकांनी आज मारुतीमंदिरात बैठक घेतली

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क


श्रीपूर मधील लहान मोठे टपरीधारक यांनी मारुती मंदिरात बैठक घेतली दर वर्षी आषाढी वारी दरम्यान रस्त्यावर फळविक्रेते पान टपरी व इतर लहान व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या टपरीधरकांच्या टपऱ्या हटवल्या जातात त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान दरवर्षी होते त्या बाबत स्थानिक वार्ताहर यांना आपली व्यथा समस्या सांगून माध्यमातून लोकप्रतिनिधी प्रशासन यांना त्यांची अडचण कळवावी या उद्देश्याने टपरीधारक यांनी बैठक बोलावून त्यांची baju मांडण्याचा प्रयत्न केला

गेली चाळीस वर्षे हे टपरीधारक या ठिकाणी लहान मोठा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याने त्यांनी तळमळीने बाजू मांडली स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणी त्यांना सहकार्य मदत करत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आल्याची त्यांची भावना आहे श्रीपूर येथील नीरा भीमा कॅनलवर अतिक्रमण केले म्हणून माळशिरस पाटबंधारे कार्यालयाकडून त्यांना सदर अतिक्रमण काढून टाकण्याबाबत अनेकदा नोटीसा दिल्या जातात नगरपंचायत ने गेल्या वर्षी या टपरीधारकांना नोटीस देऊन अतिक्रमण केल्यास फौजदारी गुन्हेदाखल करण्याचा इशारा दिला होता वास्तविक पहाता सदर जागा नगरपंच्यायत यांची नसल्याने त्यांनी ती नोटीस व इशारा थांबवला आहे या टपरीधारकांनी अशी मागणी केली आहे कीं त्यांना व्यवसाय धंद्या साठी कायम स्वरूपी जागा देऊन त्यांचेकडून पावती किंवा नियमानुसार भाडे आकारून सहकार्य करावे दर वर्षी पालखी सोहळा आला कीं टपऱ्या दुकानें हटवली जातात त्यांनी म्हटले आहे कीं आम्ही स्वतः हुन पाठीमागे सरकून रस्ता मोकळा करुन द्यायला तयार आहोत मात्र आमच्या टपऱ्या दुकान काढू नयेत ही विनंती आहे आमच्या टपऱ्या दुकान काढली जातात आणि त्या जागेवर खेळणी विक्रेते त्यांची दुकानें स्टॉल टाकतात त्यावेळी पालखी सोहळ्याला वारकऱ्यांना कसलीही अडचण त्रास होत नाही मग आमची दुकान टपऱ्या काढून आमचे का नुकसान केले जाते या ठिकाणी मागासवर्गीय बहुजन लोक उदरनिर्वाह करतात त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊन त्यांचे आर्थिक नुकसान करू नये अशी विनंती केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button