प्रार्थनेस जोडलेल्या हाता पेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र..संजय चिंतामणी

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
श्री सत्य साईसेवा समिती पुसद व साई समिती महागाव अंतर्गत, पूरग्रस्त खडका ,सवना ,लेवा आणि “हिवरा “या गावातील जवळ पास 400 महीला, पुरुष, तरुण आणि छोट्या मुला आणि मुलींना रोज लागणाऱ्या किराणा वस्तूच्या किटस्, कपडे, भांडे, आणि बिस्किट्स चे वाटप करण्यात आले, श्री सत्य साई बाबांच्या आदर्श शिकवणी वर ही संघटना सेवा कार्य करीत असते, श्री साई बाबा म्हणतात “मानव सेवा हिचं माधव सेवा तसेच प्रार्थनेसाठी जोडलेल्या हाता पेक्षा समाज सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात”. अश्या दिव्य विचारांनी प्रेरित होऊन कार्य केल्या जाते..

महागाव तालुक्यात निसर्गाने अतीशय मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे,शासन आपल्या परीने मदत करीत आहे, तरी पण “समाजातील दानशूर व्यक्तींनी, विवीध पक्षांनी विवीध सेवाभावी संस्थेनी समाज ऋण समजून आपल्या मदतीची वाट पाहणाऱ्या असंख्य कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या रुपात मदत करावी” ..असे आवाहन साई भक्त संजय चिंतामणी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले.

हया प्रसंगी श्री सत्य साई समिती पुसद चे प्रमुख डॉ संदीप चव्हाण, महागाव समितीचे प्रमुख डॉ भेंडे, ज्येष्ठ साई भक्त संजय चिंतामणी, अरुण धुमाळ, विजय जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री चव्हाण सर, माजी शिक्षणाधिकरी वानोळे, संजय मैद, उमेश आंडगे, नीलेश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रितेश पुरोहित , पत्रकार हरीभाऊ खंदारे, पत्रकार संजय कोपरकर, भरवांडे काका इत्यादी साई सेवादल तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटिल आणि प्रतिष्ठित गावकरी उपस्थीत होते




