लुमेवाडीतील सुफीसंत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुर र.हे बाबा यांच्या ३१ व्या उरुसाला आज(मंगळवार )पासून सुरुवात.

इंदापूर प्रतिनिधी समिर शेख टाईम्स 9 मराठी न्यूज
बुधवारी उरुसाचा मुख्य दिवस ..
बुधवारी इंदोरचे छोटे चांद कादरी व नागपूरचे युसुफ शोला यांच्या कव्वालीचा होणार शानदार मुकाबला…
सर्वधर्म सम भावाचे प्रतिक इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील ‘क ‘वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या गाजि-ए -मिल्लत सुफि संत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपूरवाले बाबा(रहे)यांचा ३१ वा उर्स शरीफ मंगळवार पासुन दिनांक २४ सप्टेंबरला सुरु होणार असून रात्री नऊ वाजता हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या मजारवर (समाधी) संदल चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे.
उरुसानिमित्त महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक , राजस्थान,उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. सायंकाळी चार वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथुन संदल मोठ्या उत्साहात निघून बाबांच्या मजारवर चादर चढवून उरसास सुरुवात होते. प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर संदलच्या मिरवणुकीत युवकांची मोठी गर्दी होते.बुधवारी मुख्य उरसाच्या दिवशी रात्री छोटे चाँद कादरी (इंदौर) व युसुफ शोला (नागपूर)यांच्यात कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार आहे.गुरुवारी २६ सप्टेबरला सकाळी जियारतला गोड जर्दाचे वाटप करून उरुस संपन्न होईल. परंपरेप्रमाणे येणाऱ्या भाविकांसाठी दाळभाताचे लंगरखाना (महाप्रसाद) मुख्य उरूसच्या दिवशी हजरत फत्तेह मोहंमद जोधपुरीबाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

उरसानिमित्त दर्गाहवर आकर्षक व सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.जोधपूरवाले बाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी तीन दिवस चालणाऱ्या या उरुसास हिन्दुमुस्लिम बांधव मोठी गर्दी करतात.
हजरत सूफी वली चाँद पाशा (आवाटी), हजरत सूफी अरीफबाबा (मोमिनाबाद), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान), सज्जादा नशीन सूफी हसनैन कादरी (आवाटी शरीफ) यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दर्गाह ट्रस्टी सुफी हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी बाबा (रहे.) दर्गाह कमिटी, मुस्लीम जमात व ग्रामपंचायत लुमेवाडी यांनी नियोजन केले आहे.



