राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या देय रकमेसाठी 2 ऑक्टोबरला पुणे येथे राज्यव्यापी धरणेआदोलन

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख
राज्यातील सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ग्रॅज्यूटी व पेन्शन विक्री रक्कम मिळावेत म्हणून 2 ऑक्टोबरला पुणे येथील शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्रक राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाने काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की राज्यातील जिल्हा परिषद मधून 2022 पासून आजतागायत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे सेवानिवृत्ती नंतरचे देय असलेले सेवाउपदान ( ग्रॅज्यूटी रक्कम ) अंशराशीकरण ( पेन्शन विक्रीचे रक्कम ) व सातव्या वेतनाचे फरकाचे कोट्यावधी रक्कमा शासनाकडून सेवानिवृत्ताना देय आहे गेल्या एक वर्षापासून आर्थिक तरतूदच शासन उपलब्ध करून देत नाही खाजगी अनुदानीत शिक्षकाना व कार्यालयीन कर्मचार्याना मात्र सेवानिवृत्तीनंतर महीन्याभरात सर्व रकमा दिली जाते
जिल्हा परिषद शिक्षकाचेंच थकीत ठेवले आहेत शासन जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकाना सापत्न वागणूक देत आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता धरणे आंदोलन पुणेच्या शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त कार्यालया समोर आयोजीत केला आहे
राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचे सेवानिवृत्ती नंतर 26 ते 36 लाख प्रत्येकी देय आहे असे राज्यातील 2ते 3 हजार शिक्षक आहेत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना अजीतदादा पवार ग्रामीण विकास मंत्री ना गिरीशजी महाजन शालेय शिक्षण मंत्री ना दिपक केसरकर यांना एका निवेदनाद्वारे आदोलन करणार असल्याचे कळविली आहेत 30 सप्टेंबर पर्यत रकमा नाही दिल्यास 2 ऑक्टोबर 23 रोजी राज्यातील 1500 सेवानिवृत्त आदोलन करणार आहेत असे शिवानंद भरले यांनी सागीतली आहे



