परप्रांतिय कामगार प्रश्नी युवा नेते शंभूराजे जगताप यांचा नाभिक संघटना व दुकानदार बांधवांच्या वतीने सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहरासह तालुक्यातील बलुतेदार , शेतकरी , कामगार अन् गोरगरीब जनतेची सेवा आपण आपल्या राजकिय अन् सामाजिक वाटचालीत करत आलेलो आहे . आपण आपल्या हातात हात देऊन सोबत या कोणाचे पाय धरायची गरज पडणार नाही असे प्रतिपादन मा . आ . जयवंतराव जगताप यांनी परप्रांतिय कामगार प्रश्नी निर्माण झालेला नाभिक बांधवांचा तिढा सोडवताना केले . नुकेतच शहरातील एका सलून दुकाना मध्ये परप्रांतिय कामगार आणल्याने स्थानिक नाभिक समाज अन् संबंधित सलुन चालक यांच्यात वादावादी होवून तणाव निर्माण झाला होता .
याबाबत नाभिक संघटना व दुकान मालक यांचे वतीने मा . आ . जयवंतराव जगताप यांनी सहकार्य करावे असे आवाहन करणारे निवेदन दिले होते . त्यानंतर त्यांनी नाभिक समाज बांधवांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवला . सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया चालु आहे तरी सुद्धा आवर्जून वेळ देत संघटनेच्या याबाबत झालेल्या बैठकीत सामान्यांचे प्रश्न सोडवणे आपले कर्तव्य समजून तात्काळ हा तिढा सोडवला . या बाबत कृतज्ञता म्हणून नाभिक संघटनेच्या वतीने मा.आ जयवंतराव जगताप यांचा सत्कार करण्यास संघटनेचे पदाधिकारी आले होते . परंतु महत्वाच्या बैठकी मूळे त्यांना सत्कार स्विकारता आला नाही . त्यामूळे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी हा सत्कार स्विकारला . यावेळी संघटनेचे पदाधिकारी व नाभिक समाज बांधव उपस्थित होते .



