महाराष्ट्र

बारा वर्षांपासून रखडलेले रामवाडी,निमतवाडी जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम पूर्ण करा….

अन्यथा गांधी जयंती दिनी बेमुदत उपोषण करणार. अजित झांजूर्ने यांनी दिला इशारा!!!!

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख

रामवाडी ता. करमाळा येथील ग्रामपंचायत कार्यालय व रामवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या निमतवाडी प्राथमिक शाळेचे काम मागील बारा वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे.काम पूर्ण करण्यासंदर्भात पुनर्वसन विभागाकडे वारंवार मागणी करुन ही अद्याप पर्यंत दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन अर्धवट अवस्थेतील बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा २ आँक्टोबर गांधी जयंती दिवशी तहसील कार्यालय करमाळा येथे सर्व ग्रामस्थ,विद्यार्थी यांच्या वतीने बेमुदत उपोषण येईल असा इशारा मकाई साखर कारखाना संचालक अजित झांजूर्ने यांनी तहसीलदार करमाळा यांच्या कडे निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात झांजूर्ने यांनी म्हटले आहे की पुनर्वसन विभागाकडून २०११ साली ग्रामपंचायत कार्यालय व निमतवाडी प्राथमिक शाळेच्या कामास सुरुवात झाली.परंतु अकरा वर्षे झाले तरी दोन्ही ईमारतीचे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार सद्या शेतकरी निवास येथुन चालू आहे.तर निमतवाडी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ईतर ठिकाणी पायपीट करावी लागत आहे. तर अंगणवाडी गावचावडीत सुरू आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे.परिनामी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे.

अद्यापही गावात एसटी आली नाही. नळ आणि हातपंपाचे पाणी सोडले तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्यापुर्वीच्या समस्या अजुनही कायम आहेत.शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.परंतु शासन आणि नेत्यांच्या आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही.त्यामुळे ग्रामस्थ विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाकडे अर्धवट स्थितीतील काम पूर्ण करण्याची मागणी वारंवार केली.परंतु पुनर्वसन विभाग या मागणीकडे दूर्लक्ष करत आहे.सदर निवेदनाच्या प्रति पुनर्वसन विभाग सोलापूर कार्यालय,पोलिस निरीक्षक करमाळा, गटविकास अधिकारी करमाळा,यांना देण्यात आल्या आहेत.

निमतवाडी प्राथमिक शाळा,रामवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे काम सीना माढा विभागाकडून करण्यात येत होते.परंतू सद्या तो विभाग बंद झाल्यामुळे करमाळा पुनर्वसन विभागाकडे ते काम हस्तांतरीत करण्यात आले आहे.सद्या ग्रामपंचायत कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे.तर निमतवाडी प्राथमिक शाळेचे अर्धवट काम ही नवीन ठेकेदाराला देउन लवकर पूर्ण करु.
श्री. म. वि. तुंबळ. पुनर्वसन विभाग उपअभियंता. करमाळा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button