महाराष्ट्र

इंदापूर तालुक्यात धर्मांध राजकीय पक्ष हिंदू मुस्लिम धर्मात भांडणे लावून वितूष्ट निर्माण करत आहेत – माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी

इंदापूर तालुक्यातील काही धर्माध राजकीय पक्ष हिंदू मुस्लिम धर्मात भांडणे लावून वितूष्ट आणण्याचे काम चोरीछुपे करत आहेत. अशा मंडळींना वेळीच ओळखून खड्यासारखे बाजूला सारून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
लुमेवाडी ( ता इंदापूर ) येथे सुमारे ४ कोटी ५० लाखांच्या निधीच्या कामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हनुमंत कोकाटे, दत्तात्रय घोगरे, श्रीमंत ढोले, सचिन सपकाळ, नवनाथ रुपनवर, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, सरपंच पोपट जगताप, उपसरपंच रामभाऊ कोकाटे, शाहरुख जमादार, सय्यद सर, मौलाना अब्दुल गनी शेख, सुनिल जगताप आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम पिढ्यांन पिढ्या भाईचाराने राहत आले असून तो तसाच पुढे टिकवला पण आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये काही धर्म विरोधी राजकीय पक्ष चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालून धर्म धर्मामध्ये वितूष्ट आणण्याचे काम चोरीछुपे करत आहेत. तालुक्यामध्ये विकासाची कामे तर होत राहतील परंतु सामाजिक सलोखा राखण्याचे काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच केले आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत जिएसटी, महसूल व एक्साईज मिळून ३० कोटींचा निधी जमा होत असल्याने यातून शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. अन्यथा विज जोडणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठे आंदोलन उभाररेल असे शेवटी भरणे यांनी सांगितले.
यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या दोन कोटी चाळीस लाख निधीच्या कामाचे तसेच अंतर्गत रस्ते, सभा मंडप, अंतर्गत गटर लाईन अशा दोन कोटींच्या कामांचे भूमिपूजने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच उस्मान शेख, सुत्रसंचलन शब्बीर शेख यांनी तर आभार नुरमहंमद शेख यांनी मानले. यावेळी हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, उस्मान शेख यांची भाषणे झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button