महाराष्ट्र

जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील लाठीचार्ज घटनेचे पडसाद पंढरपुरात आमरण उपोषण सुरू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिवराम गायकवाड यांनी घेतली आंदोलनकर्ते गणेश जाधव तहसील कार्यालय पंढरपूर येथे भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करीत निर्णायक लढ्यास जाहीर पाठिंबा व्यक्त केला

जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता संविधनिक मार्गाने उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनचाकी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मराठा आंदोलनकर्त्यांवार लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अंतरवाली सराटी येथील आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले ते मागे घ्यावेत यासाठी जालना जिल्ह्यानंतर पंढरपूर जि.सोलापूर येथील आंदोलनकर्ते गणेश जाधव यांनी शुक्रवार ०८/०९/२०२३ रोजीपासुन आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या या निर्णायक लढ्याला बळ मिळो ह्याच मायबाप पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जाहीर पाठिंबा देन्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button