सुरैंय्या तांबोळी व सुलभा ओव्हाळ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान

माळीनगर प्रतिनिधी——-रियाज मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780
माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सामाजिक न्यायाची प्रणेती रणरागिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माळीनगर येथील कर्तबगार महिला सुरैंय्या आरिफ तांबोळी व सुलभा पोपट ओव्हाळ यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माळीनगर गावचे माजी सरपंच अभिमान जगताप व ग्रामसेवक सचिन बनकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ व शाल सन्मानपत्र देऊन माळीनगर ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा सेविका विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांची योग्य निवड करण्यात आली याप्रसंगी विकास कांबळे, निलेश एकतपुरे, सुरज वाघमोडे, धुमाळ मास्तर, रमेश जगताप, अमर डावरे, सिद्धार्थ तावरे, मिथुन नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.



