आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सफाळे पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या प्रभावी अंमल बजावणीकरिता व निवडणुकीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीत शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत सफाळे पोलीस ठाणे ते सफाळे रेल्वे फाटक ते इंद्रप्रस्थ नारोडा नाका मार्गे कुर्लाई देवी रस्ता नाकोडा नाका मालकरी पाडा नाकोडा परिसर ते इंद्रप्रस्थ सफाळे मार्केट असा पायी रूट मार्च काढण्यात आला होता.
या रूट मार्चमध्ये सेंट्रल आर्मचे 2 अधिकारी आणि 57 अंमलदार तसेच सफाळे पोलीस ठाण्याचे 3 पोलीस अधिकारी व 14 पोलीस अंमलदार यांच्यासह अन्य 2 शासकीय वाहने असा हा रूट मार्च काढण्यात आला होता.