शहर

सफाळे माकणे येथील महिलेचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून करून आरोपी फरार..

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील माकणे येथील (57) वर्षीय महिलेचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिचा खून करून अज्ञात आरोपी फरार झाला आहे.
ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनास्थळी मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती गीता पाडवी यांनी भेट देऊन अज्ञात आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन जेरबंद करण्याचे आदेश सफाळे पोलिसांना दिले आहेत.

मयत पद्मा बहादुर सिंग बिक वय वर्ष (57) ही मूळची नेपाळ येथे राहणारी असून गेल्या एक वर्षापासून ती सफाळे माकणे ऍस्टर बिल्डिंग नाईन स्टार लँडमार्क (वडापाव स्टॉप )येथे राहत होती या आधी ती मुंबई माहीम येथे राहत होती. सोमवार दिनांक दिनांक 5 जून 2023 रोजी संध्याकाळी ती आपल्या घरातून सफाळे मांडे रोडवर फेरफटका मारण्यासाठी गेली होती. ती रात्री घरी परतलीच नाही. म्हणून तिच्या दोन मुलांसह मुलीने तिचा शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली की तिचा मृतदेह विटी लाईन रोड मांडेगाव मुजबादेवी मंदिरासमोरील एका शेतात मृत अवस्थेत पडला आहे

याबाबत त्यांनीही माहिती सफाळे पोलिसांना दिल्यावर पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी, पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील,सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी,केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांनी अज्ञात आरोपीला शोधून अटक करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button