महाराष्ट्र

जालना तालुक्यातील आंतरवली सराटी घटनेच्या निषेधार्थ ६ सप्टेंबर ला करमाळा येथे निषेध मोर्चा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटा ता अंबड जि जालना येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर काल पोलिसांनी निर्दयीपणे अनन्वित अत्याचार केला. यामध्ये अनेक महिला व पुरुष आंदोलक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.

या घटनेचा निषेध म्हणून करमाळा तालुका मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महात्मा गांधी पुतळा पोथरे नाका येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून करमाळा तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

यासंबंधीचे निवेदन आज मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन यांना दिले आहे. सदर घटनेचा शेतकरी संघर्ष समितीचे दशरथ कांबळे तसेच आरपीआयचे नागेश कांबळे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे साहेबराव वाघमारे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकाते यांनी देखील निषेध केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button