सफाळे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे आणि पालघर महसूल विभाग किरण जोगदंड यांच्या संयुक्त पथकाची कारवाई.. 1,89,516 रुपयांचा मुद्देमाल जप्त

टाईम्स 9 न्यूज मराठी नेटवर्क
पालघर जिल्हा वृत्तांत
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
पालघर जिल्ह्यातील सफाळे वैतरणा नदी पात्रातून दारशेत गावाच्या किनारपट्टी हद्दीतून अनधिकृत पणे रेती उत्खनन करणाऱ्या 2 इसमान विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातील 1 बोट सह 4 ब्रास रेती असा एकूण 1 लाख 89 हजार 516 रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी संध्याकाळी सफाळे पोलिसांनी जप्त केला आहे.
ही यशस्वी कारवाई पालघर महसूल विभाग किरण जोगदंड तलाठी पारगाव आणि सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी सफाळे वैतरणा नदीपात्रातून कांदरवन जेटी लगतच्या दारशेत गावाच्या किनारपट्टी हद्दीतून 1 बोट व त्यातील 2 अज्ञात इसम अधिकृतपणे रेती उत्खनन करत आहेत अशी गोपनीय माहिती पालघर महसूल विभाग तलाठी सजा पारगाव किरण जोगदंड यांना सूत्रांकडून मिळाली होती.1
या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याबाबत त्वरित सफाळे पोलिसांना माहिती दिल्यावर सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, पोलीस हवालदार कैलास शेळके, पोलीस हवालदार आनंदा खोत पोलीस हवालदार महेंद्र शर्मा, महसूल विभागाचे पारगाव तलाठी सजा किरण जोगदंड या संयुक्त पथकाने शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता घटनास्थळी धाड टाकल्यावर बोटीतील 2 इसम पाण्यात उड्या टाकून पळून गेले होते. यानंतर या संयुक्त पथकाने ही 1 बोट आणि बोटीतील 4 ब्रास रेती असा एकूण 1 लाख 89 हजार 516 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बोट मालक दीपक विनायक पाटील राहणार (सफाळे सोनावे) व मजूर समीर विष्णू घरत राहणार (सफाळे पारगाव ) यांच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.



