पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरार राजोडी बीचवर राबवले एक तारीख एक घंटा स्वच्छता अभियान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारत देशात एक तारीख एक घंटा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.1ऑक्टोंबर 2023 रोजी एक तारीख एक घंटा स्वच्छता उपक्रमांतर्गत स्वच्छता श्रमदान करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेनुसार त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करत पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी एक तारीख एक घंटा स्वच्छता हा उपक्रम वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील राजोडी बीचवर राबवून राजोडी बीचवरील कचरा स्वतः उचलून राजोडी बीच स्वच्छ केला

हा उपक्रम राबवताना वसई विरार महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे व इतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



