महाराष्ट्र

विकास नगर – अकलूज येथील धोकादायक अंगणवाडी कडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे – बहुजन ब्रिगेड महासंघाची मागणी.

प्रतिनिधी… रियाज- मुलाणी मो.9921500780

विकासनगर – अकलूज येथील अंगणवाडी अत्यंत धोकादायक पद्धतीने मोडकळीस आली आहे. या अंगणवाडीत मध्ये कुणी चुकून गेले तर प्राण हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही

तरी प्रशासनाने या अंगणवाडीचे नव्याने बांधकाम करावे व होणारा धोका टाळावा अकलूज नगर परिषद यांना तक्रारी देऊन सुद्धा आजपर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत

याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे असे बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने सांगण्यात आले जर प्रशासनाने अंगणवाडी विषय ठोस उपाय योजना न केल्यास उग्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा

गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना तक्रारी निवेदनाद्वारे देण्यात आला प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते, उपाध्यक्ष गणेश साठे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button