नोकरी करणारे नाही….तर नोकरी देणारे व्हा… खासदार राजेंद्र गावित यांचे पालघर जिल्ह्यातील तरुणांना आवाहन…

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी चिंचणी गावदेवी माता सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार राजेंद्र गावित यांनी या शिबिरात उपस्थित तरुणांना नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हा.. स्पर्धेच्या युगात तसेच संगणकीय व डिजिटल युगात स्पर्धा करत असताना स्वतःच्या वृद्धी सोबत आपला समाज आपला गाव, आपला जिल्हा ह्याला सुद्धा पुढे घेऊन जा..आयटीआय मध्ये अनेक ट्रेन्स आहेत.
आपल्या कौशल्यानुसार त्यामध्ये प्रावीण्य मिळवा तसेच आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ द्या असे आव्हान खासदार राजेंद्र गावित यांनी केले.तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगाव मधील दोन विद्यार्थ्यांची जपान येथे नोकरीसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चा करिता वैयक्तिक निधी देणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.

या कार्यक्रमास रजनीकांत भाई श्रॉफ (ज्येष्ठ शिक्षण तज्ञ),पंकज कोरे (उपाध्यक्ष जिल्हा परिषद), जयेंद्र दुबळा (सदस्य जिल्हा परिषद), नितेश दुबळा (सरपंच चिंचणी),रमेश वझे (ज्येष्ठ समाजसेवक) संजय भोई (प्राचार्य), महेश कुमार सिडाम (जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी पालघर), तसेच अधिकारी वर्ग कर्मचारी तसेच युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



