शहर

डाॕ.एम.के.इनामदार यांच्या आश्विनी हाॕस्पिटल ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.आबासाहेब देशमुख यांचे कृतज्ञता व्यक्त करणारे पञ

उपसंपादक—-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.—9730 867 448

आदरणीय डॉक्टर एम के इनामदार अश्विनी हॉस्पिटल
अकलूज सप्रेम नमस्कार
पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ म्हणून आपण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि विदेशात आपण नावलौकिक कमावला आहे त्यामुळे आपल्या आश्विनी हॉस्पिटल ला “आंतरराष्ट्रीय गुणवत्ता “प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आपले व आपल्या हॉस्पिटलच्या सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन .

मागील तीन दशकाहून अधिक काळ आपण माळशिरस तालुका व परिसरातील लोकांची वैद्यकीय सेवा आपण आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने केली आहे. आज अकलूज व परिसरामध्ये आजारपण म्हटलं की प्रथम आपली (डाॕ. एम .के. इनामदार )आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये कितीही सिरीयस पेशंट आला तरी आपण आता मरत नाही अशी भावना रुग्णांमध्ये झाली आहे.

आपले वैद्यकीय ने पुण्य व वैद्यकीय व्यवसायावरील आपली प्रचंड निष्ठा व न थकता अत्यंत उत्साहात व मनापासून अहोरात्र कष्ट करण्याची आपली तयारी यामुळे आज आपल्या हॉस्पिटलचा नावलौकिक मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र याच्या बाहेरही गेलेला दिसतो.

आपल्या हातून भविष्यातही अशाच प्रकारचे उच्च दर्जाचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात काम व्हावे. त्यासाठी परमेश्वर आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायु देवो ,आपला वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठा लौकिक आहे तो आणखी वृद्धिंगत व्हावा हीच या निमित्त परमेश्वर चरणी प्रार्थना करतो .

आपला,
डॉ. आबासाहेब देशमुख
माजी प्राचार्य
शंकरराव मोहिते महाविद्यालय ,अकलूज व
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button