महाराष्ट्र

संविधान रक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ॲड सुमित सावंत यांची निवड…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल यांचे वतीने दिला जाणारा मानाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान रक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ॲड.सुमित सावंत यांची निवड करण्यात आली असून शुक्रवार दिनांक 02 मे 2025 रोजी नातेपुते येथे होणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान सोहळा या कार्यक्रमाध्ये मान्यवरांचे शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे वतीने जाहीर करण्यात आले…

ॲड सुमित सावंत यांनी
सन २०१४ सालापासून माळशिरस येथे दिवाणी,फौजदारी व महसुली क्षेत्रामध्ये वकिलीचे काम सुरु करुन प्रसंगी नाममात्र फी अथवा नि:शुल्क कायदेशिर सहाय्य व अनेक गोरगरीब लोकांना मदत करण्याचे काम केले.तसेच अनेक व विविध सामाजिक संघटना,वर्तमानपत्रे तथा राजकीय पक्ष यांचे अधिकृत कायदेशिर सल्लागार म्हणुन काम पाहीले आहे…

लहान पासुनच वेगवेगळ्या आंदोलनामध्ये उत्सपूर्त सहभाग,आंबेडकरी चळवळीचा प्रभाव असल्याने कुमार वया पासुन सामाजिक कामाची आवड,विविध स्पर्धा आयोजित करुन सामाजिक उपक्रम सादर करणे,भारतीय संविधानाच्या जनजागृतीसाठी सतत प्रयत्न केले आहे.जागर संविधानाच्या अंतर्गत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले…

अतिशय कमी वयामध्ये वकीली क्षेत्रामध्ये नाव लौकीक मिळवुन मोजक्या वकीलांच्या पंक्तीत जावुन चांगल्या प्रकारे वकीली चालवत असताना सुध्दा सामाजिक भान व समाजा प्रती असणारे प्रेम जोपासत सर्वसमावेशक,सर्वांना सोबत घेवुन सामाजिक कार्य अखंडपणे सुरु ठेवले आहे…

तसेच चालता बोलता जागर संविधानाचा या उपक्रमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत संविधान पोहचविण्याचे ते काम करीत आहेत, याची दखल घेऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल यांचे वतीने पुरस्कार जाहीर केल्याचे म्हटले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button