महाराष्ट्र

राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी यांच्या वतीने सवलतीच्या दरात दिनांक सात जुलै रविवारी रोजी मूळव्याध उपचार शिबिराचे आयोजन.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूळव्याध तज्ञ डॉ. प्रदीप तूपेरे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.०७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दु ३ या वेळेत राजेश्वर हॉस्पिटल, करमाळा रोड कोर्टी येथे सवलतीच्या दरात मूळव्याध उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रदीप तूपेरे हे राज्यातील प्रसिद्ध मूळव्याध तज्ञ असून, या शिबिरासाठी त्यांचे बहुमोल असे मागदर्शन लाभणार आहे.

कोर्टी येथील राजेश्वर हॉस्पिटल हे गेल्या दहा वर्षापासून सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य शिबीराचे नियोजन करत असते. चालू वर्षी मार्च महिन्यात राजेश्वर हॉस्पिटलच्या डॉ. अमोल दुरंदे यांनी अहमदनगर येथील प्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलच्या सहयोगाने आरोग्य विषयक सुपर स्पेशलिटी शिबीर यशस्वी करून दाखवले या शिबिरात तालुक्यातील हजारो रुग्णांना लाभ मिळाला.

आता मूळव्याध सारख्या दुर्धर आजारावर नागरिकांना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध व्हावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा हा छोटासा प्रयत्न हॉस्पिटलच्या माध्यमातून करीत आहोत तरी जास्तीत जास्त गरजू पेशंटने या शिबीराचा लाभ घ्यावा असे शिबीराचे मुख्य संयोजक डॉ. अमोल दुरंदे व डॉ. विद्या अमोल दुरंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button