महाराष्ट्र

अकलूज येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 483 वी जयंती उत्साहात साजरी

टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क अकलूज

अकलूज येथील महाराणा प्रताप सिंह चौकात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 483 वी जयंती सकल अकलूज शहर घिसाडी समाज यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

प्रारंभी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री व शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्त महाराणा प्रताप सिंह यांच्या जीवनावर सचिन शिंदे यांचे व्याख्यान संपन्न झाले

याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माने पाटील अकलूज ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पांडुरंग भाऊ देशमुख तसेच सकल अकलूज शहरातील घिसाडी समाज बांधव व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button