शहर
गो-हे ग्रामपंचायत तर्फे “मेरी माटी मेरा देश”अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

प्रतिनिधी राजेंद्र भोईर , टाईम्स 9 मराठी न्यूज
विक्रमगड :-वाडा तालुक्यातील गो-हे ग्रामपंचायत येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

त्यानिमित्ताने गो-हे ग्रामपंचायत तर्फे शिला फलक अनावरण, वसुधा वंदन अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम, तसेच स्वातंत्र्य विरोंको वंदन उपक्रमांतर् शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मांडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य सौ.अक्षदा चौधरी गो-हेगावचे सरपंच सौ. हर्षदा पडवळे, उपसरपंच श्री अनिल खिलारे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक श्री दीपक पाटील ग्रामपंचायत कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते.




