शहर

राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “मेरी माटी मेरा देश”अभियाना अतर्गत डहाणू चिंचणी एम.के ज्युनिअर कॉलेज मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील एम्.के.ज्युनिअर कॉलेज मध्ये 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत 15 ऑगस्ट पर्यंत नियोजित कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे .त्यानिमित्ताने एन. एस. एस. विभागातर्फे 10 ऑगस्ट 2023 रोजी रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी शहीद विरोंको वंदन उपक्रमांतर्गत चिंचणी येथील शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर देशी 75 रोपांचे वृक्षारोपण कार्यक्रम काँलेजच्या आँक्सिजन गार्डन मध्ये आयोजित करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विरोंका अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पर्यवेक्षिका सौ.स्वाती राऊत उपस्थित होत्या तर सत्कार सोहळ्यास कारगिल युद्धात सहभागी व विजय मिळवून भारताच्या विजयाची यशोगाथा प्रत्यक्ष अनुभवलेले शुरविर मा. श्री. प्रमोद कुमार पांडे – नेव्ही व मा.श्री.रघुनाथ डोले सुभेदार ( सोल्जर) याचा यथोचित सन्मान करण्यात आला. कारगिल युद्धातील झालेल्या चकमकीतले थरारक अनुभव सैनिकांनी घेतलेले कष्ट, खडतर प्रशिक्षण, रात्र दिवस सिमेवर पहारा करणे यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली.

विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि देशसेवा केली पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा.श्री. रजनीकांतभाई श्राँफ, श्री.महेश रावते,-मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक श्री.सुनिल बैसाणे, उपप्राचार्या सौ.संगीता चुरी, विभाग प्रमुख श्री.सुरज आष्टेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.एकनाथ पाटील यांनी केले तर आभार प्रा. प्रिती राऊत यांनी केले. सूत्रसंचालन कु.श्रध्दा शुक्ला हया विद्यार्थीनीने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button