महाराष्ट्र

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची तालुकास्तरीय आढाव बैठक

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147

माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची तालुकास्तरीय आढाव बैठक दिनांक ७ जुलैला इंदापूर पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीस इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांच्या विभाग प्रमुखाला बैठकीस आपापल्या खात्यांच्या कामाची माहिती घेऊन येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सदर बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका, पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी, वनअधिकारी, जलसंपदा अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, महावितरण अधिकारी, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी असे सर्व विभाग प्रमुखांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार असल्याची माहिती इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button