महाराष्ट्र

गणेशवाडीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात संपन्न

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123

गणेशवाडी गावाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी आईचा परंपरेप्रमाणेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. परंपरेप्रमाणे मानाचा नैवेद्य, नारळ गावाच्या पाटलांकडे असतो. त्यानंतरच गावकरी आपला नैवेद्य, नारळ लक्ष्मी आईस दाखवतात त्यावेळी मोठी गर्दी होते.

गणेशवाडी गावाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी आईची यात्रा आषाढ महिन्याच्या पोर्णिमेस घेतली जाते. त्यासाठी पोतराज नवनाथ मोहिते व शोभा मोहिते यांनी दुपारी बारा वाजता पाटील वाड्यासमोर ग्रामस्थांसह उपस्थित राहून मानाच्या ताटासह गावातील इतर देवी देवतांना नैवेद्य, नारळ करत पुढे जात राहतात.

गावकरी, महिला, अबालवृद्ध, ग्रामस्थ यांच्यासह हलगी, झांजेच्या तालावर पोतराज नवनाथ मोहिते यांनी सर्वांना बरोबर घेत ग्रामदैवतास नैवेद्य दाखवला. त्यानंतर ग्रामस्थांनी आपला नैवेद्य नारळ दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button