शहर

केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विळंगी गावात गौरी- गणपती विसर्जनाच्या आरती दरम्यान राडा.. दोन गटातील 26 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विळंगी गावात गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या नंतर झालेल्या आरती दरम्यान दोन गटांमध्ये शनिवारी रात्री राडा झाला असून या दोन्ही गटातील महिला पुरुष अशा 26 ग्रामस्थांवर केळवा सागरी पोलीस ठाण्यात
रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले असून हा राडा विळंगी गावच्या मंडळाच्या पैशांचा हिशोबावरून झाला आहे.

शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी विळंगी गावातील ग्रामस्थ गावातील सार्वजनिक तलावावर गौरी गणपतीचे विसर्जन करून आल्यावर रात्रीच्या साडे अकरा ते बारा दरम्यान ब्रम्हशंकर मंदिर विळंगी पूर्व आळी येथे गणपतीच्या पाटांची आरती करत असताना रेखा धांगडे गटातील आणि सविता महेश पाटील यांच्या गटामध्ये मंडळाच्या पैशाच्या हिशोबावरून वाद झाला

या वादाला गंभीर स्वरूप प्राप्त होऊन या दोन्ही गटातील ग्रामस्थांनी एकमेकांना सार्वजनिक ठिकाणी सण उत्सवाच्या दरम्यान मारहाण करून शांतता भंग केल्याप्रकरणी या दोन्ही गटातील महिला पुरुष अशा एकूण 26 ग्रामस्थांवर रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले असून याबाबत अधिक तपास केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button