महाराष्ट्र

शेळया व बोकड चोरीच्या गुन्हयातील ३ आरोपींना व २ विधीसंघर्ष बालकांना इंदापूर पोलीसांनी जेरबंद करून चोरीचे १७ गुन्हे केले उघड

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123

इंदापुर पोलीस स्टेशन अंकीत बावडा पोलीस दूरक्षेत्र, निमगाव केतकी, सरडेवाडी परीसरातील शेतकऱ्यांच्या शेळया, बोकड चोरी करणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.

याबाबत मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे, पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले दोन्ही (रा. रेडा ता. इंदापुर) निलेश बाबासाहेब सरवदे (रा. काटी ता. इंदापूर) व दोन विधीसंघर्ष बालकांचा यात समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५३ हजार ५०० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

सदर बाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव केतकी, सरडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकड चोरीच्या वाढत्या प्रमाणाच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी बावडा पोलीस दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा. फौजदार के.बी. शिंदे, पो. ना. गायकवाड, पो.कॉ. विनोद लोखंडे, आरीफ सयद, विक्रम जमादार यांना चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानूसार नागनाथ पाटील व त्यांच्या तपास पथकाने प्राप्त माहीतीच्या आधारे १) मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे २) पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले ३) निलेश बाबासाहेब सरवदे व दोन विधीसंघर्ष बालक यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानी एक ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडे अधिकचा तपास करता इंदापूर पोलीस स्टेशनचे १७ गुन्हे उघड करून चोरीमधील ५३ हजार ५०० रुपये रोख रक्कम मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा. फौजदार के. बी शिंदे, पो. हवा जाधव, पो.ना. सुनील कदम, पो.ना. कळसाईत, पो.ना.गायकवाड, पो.ना. हेगडे, पो. कॉ. खरीप सय्यद, अकबर शेख, विक्रम जमादार, गणेश डेरे, विनोद लोखंडे, नंदु जाधव यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button