महाराष्ट्र

मराठा समाज आंदोलकांवर केलेला लाठी चार्ज चा बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने जाहीर निषेध

प्रतिनिधी..रियाज- मुलाणी मो.9921500780

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी गावात चार दिवसापासून शांततेस उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष्य लाठी मार केला त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यात या प्रकरणी बंद व रस्ता रोको चे हत्यार उपसण्यात आले अनेक ठिकाणी मराठा समाजा रस्त्यावर उतरला आहे.

सत्ताधारी सरकार विरोधात असताना आरक्षणाची मागणी करत होते पण सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढण्याच्या हेतूने पोलीस बाळाचा वापर करून आंदोलन कर्त्यावर लाठीचार्ज करणे हे अत्यंत लाजिरवाणी असून निंदनीय आहे असे बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी मोहिते ,यांनी मत व्यक्त केले त्यांच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी अकलूज,यांना निषेधाचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी संस्थापक उपाध्यक्ष गणेश साठे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नागेश ठोंबरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button